उद्या थलपती विजय मुख्यमंत्रिपदावर विराजमान होणार...
चेन्नई – तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाने 108 जागा जिंकून आपणच सर्वात मोठा पक्ष असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे तामिळनाडू राज्यात थलपती विजय यांचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. त्यानुसार आज थलपती विजय यांची विधिमंडळ गटनेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आपलं बहुमत सिद्ध करून उद्या थलपती विजय तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
टीव्हीकेने आपल्या सर्व आमदारांना महाबलीपुरममधील एका हॉटेलवर ठेवले आहे. तसेच थलपती विजय यांनी काँग्रेसकडे पाठिंब्याची मागणी केली असून याबाबत काँग्रेसनेही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.