पंजाबमध्ये एकापाठोपाठ दोन स्फोट... राज्यात हायअलर्ट जारी
अमृतसर - पंजाब राज्यात २४ तासात एकापाठोपाठ दोन स्फोट झाले आहेत त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. जालंधरमधील सीमा सुरक्षा दलाच्या मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट घडला. या घटनेच्या काही तास आधी जालंधरमधील गजबजलेल्या 'बीएसएफ चौक' परिसरात एका उभ्या असलेल्या स्कूटरचा भीषण स्फोट झाला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्फोटानंतर आगीचे गोळे आणि धूर हवेत उडताना दिसत आहेत.
या घटनांनंतर संपूर्ण राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांनी तपास तीव्र केला आहे.