राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्यावतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना अभिवादन
कोल्हापूर - राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त दसरा चौकातील ऐतिहासिक पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय रोठोड यांच्या हस्ते पुष्पांजली अर्पण करण्यात आली. यानंतर शाहू स्मारक येथील अर्धाकृती पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ट्रस्टच्या कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी ट्रस्टचे विश्वस्त पोलीस अधीक्षक नोलोत्पल, विश्वस्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, विश्वस्त शिवाजी विद्यापीठाच्या प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी तथा ट्रस्टचे सदस्य सचिव गजानन गुरव, विश्वस्त डॉ. अशोक चौसाळकर, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ, प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे आणि व्यवस्थापक डी. एम. नांगरे, पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील उपस्थित होते.