गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा ; सर्वोच्च न्यायालयाचे ९० दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश

<p>गोकुळ निवडणुकीचा मार्ग मोकळा ; सर्वोच्च न्यायालयाचे ९० दिवसांत निवडणुका घेण्याचे आदेश</p>

कोल्हापूर  - गेल्या आठवडाभरात गोकुळ दूध संघाच्या घडामोडींना वेग आला असून अखेर संघाच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने प्रलंबित निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत ९० दिवसांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे दीर्घकाळ रखडलेल्या निवडणुकांवर पडदा पडण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाची मुदत ४ मे रोजी संपुष्टात आली. त्यानंतर तात्काळ प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे. या घडामोडींमुळे संघाच्या कारभारात प्रशासकीय हस्तक्षेप वाढला असतानाच निवडणुकांबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता निवडणूक प्रक्रिया वेगाने राबवली जाणार असून, गोकुळच्या राजकारणात पुन्हा हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विविध गटांकडून तयारीला सुरुवात होण्याचे संकेत मिळत आहेत. स्थानिक पातळीवर या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता असून, आगामी काळात गोकुळच्या सत्तेसाठी राजकीय चुरस रंगण्याची चिन्हे आहेत.