आता राष्ट्रीय गीताचा अवमान करणं पडणार महागात...

केंद्राकडून  कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी

<p>आता राष्ट्रीय गीताचा अवमान करणं पडणार महागात...</p>

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच 'वंदे मातरम्' या राष्ट्रीय गीताच्या कायद्यात सुधारणा करण्यास मंजुरी दिली आहे. या सुधारणेनुसार 'वंदे मातरम्' गाताना अडथळा आणल्यास किंवा त्याचा अपमान केल्यास गुन्हा दाखल होणार आहे.

तसेच या कायद्यांतर्गत राष्ट्रगीत (जन गण मन), राष्ट्रध्वज आणि भारतीय राज्यघटनेचा अवमान केल्यास 3 वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, तीच आता राष्ट्रीय गीतालाही लागू होणार आहे. अधिकृत कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् मधील सर्व सहा कडवी (साधारण 3 मिनिटे वेळ) गायली किंवा वाजवली जावीत. तसेच, ज्या कार्यक्रमात राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत दोन्ही वाजवले जाणार असतील, तिथे राष्ट्रीय गीताला (वंदे मातरम्) प्राधान्य द्यावे, असे म्हटले आहे.