कोल्हापुरातील चप्पल लाईनला आग... 

<p>कोल्हापुरातील चप्पल लाईनला आग... </p>

कोल्हापूर – शहरातील चप्पल लाईन येथील दोन चप्पल दुकानांना काल (मंगळवारी) रात्री अचानक आग लागली. या आगीत दोन चप्पल दुकानांचे  जवळपास 50 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तब्बल दोन तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. 
अभिमन्यू गवळी यांच्या मालकीचे एंटरप्राइजेस तर मनोज कनेरकर यांच्या मालकीचे कनेरकर फुटवेअरचे हे दोन चप्पल दुकान आहेत. मंगळवारी रात्री गवळी आणि कनेरकर आपली दुकाने बंद करून घरी गेले. यानंतर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अचानक कनेरकर फुटवेअर आणि ए.जी. एंटरप्राइजेस या दोन चप्पल दुकानांच्या छतावरून मोठमोठे आगीचे लोट बाहेर पडत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.