नसरापूरच्या त्या नराधमाबाबत वकिलांची ठाम भूमिका...वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार... 

<p>नसरापूरच्या त्या नराधमाबाबत वकिलांची ठाम भूमिका...वकीलपत्र घेण्यास वकिलांचा नकार... </p>

पुणे - नसरापूर प्रकरणातील नराधम भीमराव कांबळे याच्याबाबत वकिलांनी ठाम भूमिका घेतली आहे. या नराधमाने केलेल्या विकृत कृत्यामुळे वकिलांनी त्याचे वकीलपत्र घेण्यास साफ नकार दिला आहे. 
भोर बार असोसिएशनमधील कोणताही वकील आरोपीचे वकीलपत्र स्वीकारणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आरोपीला कायदेशीर मदत मिळण्यास अडचण येणार आहे.
तसेच या प्रकरणातील पिडीत कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले आहे. आरोपीला मृत्यू दंडाचीच शिक्षा होईल, स्पेशल फास्टट्रॅक कोर्ट नेमून कारवाई करु, असे म्हटले आहे. तसेच कुटुंबाला सर्व शासकीय मदत पुरवणार असल्याचेही जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी म्हटले आहे.