सत्तेत असणाऱ्या महायुती सरकारलाच गोकुळवर प्रशासक यावं, असं वाटत होतं का ? : आ. सतेज पाटील यांचा सवाल 

<p>सत्तेत असणाऱ्या महायुती सरकारलाच गोकुळवर प्रशासक यावं, असं वाटत होतं का ? : आ. सतेज पाटील यांचा सवाल </p>

 

कोल्हापूर – मंत्री हसन मुश्रीफ महायुतीचा जप करतायत त्यामुळे आम्ही आमचा विचार घेवून पुढे जाणार आहोत. जे कोणी सोबत येतील त्यांना सोबत घेवून गोकुळची निवडणूक लढवणार असल्याचं वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत केले आहे. 

सत्तेत असणाऱ्या महायुती सरकारलाच गोकुळवर प्रशासक यावे, असे वाटत होते का ? असा सवाल करत त्यांनी महायुतीच्या नेत्यांना टोला लगावला. आ. शिवाजी पाटील यांच्या आरोपावर बोलताना त्यांनी अंतर्गत भांडणामुळे गोकुळ अडचणीत का आणता असे म्हटले आहे. गोकुळ आणि जिल्हा बँक ही जिल्ह्याची अर्थवाहिनी आहे. लोकांना न्याय मिळाला पाहिजे, बँक टिकवली पाहिजे यासाठी आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवून जातो. जिल्हा बँक नसेल तर शेतकऱ्यांची काय अवस्था होते हे आम्ही पाहिलं आहे. संस्था टिकली पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, परंतु असे प्रयत्न होताना दिसत नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.