भाजप म्हणजे जनता नाही : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे घमासान 

<p>भाजप म्हणजे जनता नाही : लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधींचे घमासान </p>

नवी दिल्ली – कालपासून लोकसभेत महिला आरक्षण विधेयकावर चर्चा सुरु आहे. यावर आज बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, विरोधी पक्ष महिला आरक्षणाच्या विरोधात नाही, परंतु सध्याच्या स्वरूपातील विधेयकाला पाठिंबा देणार नाही, कारण ते परिसीमनाच्या नावाखाली निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न करत आहेत, विरोधी पक्ष नेत्यांचे भाषण म्हणजे पीसी सरकारची जादू, असल्याचे त्यांनी म्हटल्यावर सत्ताधाऱ्यांनी लोकसभेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
यावेळी भाषण देताना राहुल गांधी यांनी, आम्ही देशातील जनतेवर नाही तुमच्यावर टीका करतोय. जुने विधेयकाला आम्ही तातडीने समर्थन देऊ. सरकार जातीय जनगणेकडे दुर्लक्ष करत आहे. आम्ही देशाच्या घटनेवर हल्ला होऊ देणार नाही. ओबीसीकडून सत्ता काढून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसींना त्यांच्या अधिकाऱ्यांपासून रोखले जात आहे. भाजपा राजकीय पक्ष आहे, जनता नाही. भाजपने जनता आणि सैन्याच्या सावलीतून बाहेर यावे. भाजप म्हणजे भारत नाही, असा घणाघात त्यांनी केला. यावेळी गोंधळ सुरु झाल्याने  खा. अखिलेश यादव यांनी, तुम्ही जातीय जनगणना करणार आहे का हे जाहीर करावे, असे म्हटले.