कैसे हराया... म्हणत विरोधकांना डिवचणारी ‘ही’ नगरसेविका ‘नॉट रिचेबल’

<p>कैसे हराया... म्हणत विरोधकांना डिवचणारी ‘ही’ नगरसेविका ‘नॉट रिचेबल’</p>

मुंबई – ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या विजयानंतर व्यासपीठावरून कैसे हराया... म्हणत विरोधकांना डिवचणारी एमआयएमची नगरसेविका सहर शेख ही नॉट रिचेबल झाली आहे.

बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी नगरसेविका सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी त्यांची चौकशी सुरु असताना ती  मागील 24 तासांपासून नॉट रिचेबल झाली आहे त्यामुळे उलट – सुलट चर्चांना उधाण आले आहे. असे असताना वानखेडे स्टेडियमवर सामना पाहण्यासाठी सहर शेख दाखल झाली होती. याबाबत सहर शेख हिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आले आहे.