महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्र शब्द न काढणाऱ्या तुम्ही...: सुषमा अंधारेंची प्राजक्ता माळीवर टीका  

<p>महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्र शब्द न काढणाऱ्या तुम्ही...: सुषमा अंधारेंची प्राजक्ता माळीवर टीका  </p>

मुंबई – मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्यामुळे प्राजक्ता माळी चांगलीच चर्चेत आली आहे. यावर  उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विटर करून  तिच्यावर सडकून टीका केली आहे. 

"प्राजक्ताजी तुम्ही हास्य जत्रेच्या निवेदिका आहात आणि हा कार्यक्रम आम्ही आवडीने बघतो... पण राज्यातल्या एकूण महिला लैंगिक शोषणाच्या एकाही प्रश्नावर ब्र शब्द न काढणाऱ्या तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या ब्रँडिंग वर बोलायला लागलात तर हास्यजत्रे मधल्या स्कीट पेक्षा सुद्धा ते  जास्त हास्यास्पद वाटायला लागेल...", असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.