पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने स्वत:ला संपवले... इचलकरंजी शहरातील घटना
इचलकरंजी – शहरातील गांधी विकासनगरमध्ये पत्नीच्या छळाला कंटाळून पतीने स्वत:ला संपवले असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
गांधी विकासनगरमध्ये राहणाऱ्या मारुती सदाशिव शेंडूरे यांना पत्नी माया हिच्याकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक मिळत होती. माया आणि तिचा मित्र उमेश हिरवे यांच्या त्रासाला कंटाळून मारुती शेंडूरे यांनी नदीत उडी घेऊन आपले जीवन संपवले आहे.
यावेळी मारुती यांची चिठ्ठी पोलिसांना मिळाली आहे. यामध्ये माया आपला कसा छळ करत होती याबाबत मारुती यांनी उल्लेख केला आहे. माया आणि उमेश हिरवे या दोघांनी मारुती यांना आत्म्हत्येसाठी प्रवृत्त केल्याची तक्रार नातेवाईक सुनील नाईक यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात केली आहे. त्यानुसार पत्नी माया शेंडूरे आणि उमेश हिरवे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक मृणालिनी पाटील करत आहेत.