‘या’ दिवसापासून शिक्षक अन् शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार...
कोल्हापूर - राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी तात्काळ करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, दहा वर्षे सतत काम करत असलेल्या सर्व कंत्राटी, रोजंदारी, अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित कराव्या, प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्वावरील नियुक्ती द्यावी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील निर्बंध तात्काळ उठवावे, यासह अन्य मागण्यासाठी येत्या २१ एप्रिलपासून सरकारी, निमसरकारी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची घोषणा कर्मचारी संघटनेने केली आहे.