कोल्हापूर जिल्ह्याला पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट...
मुंबई – मुंबईच्या हवामान विभागाने उद्यापासून कोल्हापूर जिल्ह्याला तीन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
तसेच ठाणे,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, मुंबईलाही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हे सर्व जिल्हे पुढील तीन दिवस पावसाने सुखावणार आहेत.