आज पिडिता आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला : खा. सुप्रिया सुळे 

<p>आज पिडिता आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला : खा. सुप्रिया सुळे </p>

पुणे – आज नसरापूर बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा ५५ दिवसांनी निकाला लागला आहे. अशा प्रकरणाचा कमी वेळेत आणि आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. यावर बोलताना खा. सुप्रिया सुळे यांनी,अखेर पीडित चिमुकलीला न्याय मिळाला असून आम्ही सर्वजण या निकालाचे स्वागत करतो, असे म्हटले आहे.  

ही घटना अतिशय दुर्दैवी होती. अशा घटनांची सुनावणी फास्टट्रॅक कोर्टात होऊन आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आम्ही सातत्याने मांडत आलो आहोत. आज पिडिता आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पिडितेला भावपूर्ण श्रद्धांजली वाहत खा. सुप्रिया सुळे यांनी, या घटनेचा तपास अधिकाऱ्यांनी उत्तमरित्या करुन पुरावे कोर्टापुढे सादर केले. याबद्दल तपास यंत्रणांचेही मनापासून आभार त्यांनी मानले आहे.