अखेर नसरापुरातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली ; पुणे न्यायालयाचा निकाल 

<p>अखेर नसरापुरातील आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली ; पुणे न्यायालयाचा निकाल </p>

पुणे – सर्व राज्याचं लक्ष लागू राहिलेल्या नसरापूर प्रकरणातील  आरोपीला पुणे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
 काही दिवसांपूर्वी पुणे न्यायालयामध्ये या प्रकरणावर सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले होते. आज अंतिम शिक्षेवर सुनावणी पार पडली. 
या सुनावणी वेळी विशेष सरकारी वकिलांनी  फाशीच्या शिक्षेची मागणी करताना समर्थनातील सर्वोच्च न्यायालयाचे १२ निकाल जोडले आहेत. यावेळी बऱ्याचश्या केसेसमधील आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याचे नोंदवण्यात आले आहे.