अधिक चर्चेत असलेल्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना मोदी सरकारमधून मिळणार डच्चू...

<p>अधिक चर्चेत असलेल्या ‘या’ केंद्रीय मंत्र्यांना मोदी सरकारमधून मिळणार डच्चू...</p>

नवी दिल्ली - ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक राहिलेली नाही किंवा ज्या राज्यांमध्ये आगामी काळात निवडणुका आहेत, तेथील समीकरण साधण्यासाठी काही कनिष्ठ मंत्र्यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातून डच्चू  मिळण्याची शक्यता आहे. 

त्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा पत्ता कट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून नीट पेपर फुटीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री चांगलेच चर्चेत आहेत तर वाढत्या पेट्रोल – डिझेलच्या किंमतीमुळे पेट्रोलियम मंत्री अधिक चर्चेत आले होते.