फुल विक्रेत्याच्या दुचाकीतून रोकड चोरणारा जेरबंद; जुना राजवाडा पोलिसांची कारवाई
कोल्हापूर – शहरातील शिवाजी पेठेत राहणारे संतोष शिंदे हे शिंगोशी मार्केटमध्ये फुले विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी १९ जून रोजी ते शिंगोशी मार्केटमध्ये फुल विक्री करत असताना त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतील सुमारे ९० हजार रुपयांची रोकड चोरीला गेली होती. या प्रकरणी संतोष शिंदे यांच्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान आज जुना राजवाडा पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संतोष शिंदे यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड चोरणाऱ्या विजापूरच्या संतोष हनुमंत कट्टीमनी याला अटक केली आहे. संतोष कट्टीमनी याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल संच आणि किरकोळ रोकड जप्त केली आहे.