राजारामपुरी पोलिसांनी फिर्यादींना साडेअठरा लाखांचा मुद्देमाल केला परत... 

फिर्यादींने पोलिसांचे मानले आभार

<p>राजारामपुरी पोलिसांनी फिर्यादींना साडेअठरा लाखांचा मुद्देमाल केला परत... </p>

कोल्हापूर - पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी चोरीच्या गुन्हे उघडकीस आणून जप्त केलेला मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

त्यानुसार आज राजारामपुरी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात उकल करून जप्त केलेला मुद्देमाल आज मुळ फिर्यादींना परत देण्यात आला. कल्पेश ओसवाल, सौरभ पाटील, नरेंद्र शिंदे, राहुल हावळ यांना शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते सोन्या - चांदीचे दागिने आणि पाच लाखांची रोकड परत करण्यात आली. राजारामपुरी पोलिसांकडून आज जवळपास साडेअठरा लाखांचा मुद्देमाल परत करण्यात आला.

राजारामपूरी पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार नितीश कुराडे, श्रुती काटकर, हरीश पाटील यांनी न्यायालयाशी समन्वय ठेवून मुद्देमाल फिर्यादींना परत करण्याविषयीचे आदेश प्राप्त करून घेतले. त्यानुसार शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्या उपस्थितीत जप्त मुद्देमाल फिर्यादींना परत करण्यात आला.