महापालिकेतील महायुतीच्या ‘या’ नगरसेवकाला मोठा धक्का...

<p>महापालिकेतील महायुतीच्या ‘या’ नगरसेवकाला मोठा धक्का...</p>

कोल्हापूर – शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या व्हिडीओचे प्रकरण ताजे असताना कोल्हापूर  महापालिकेत महायुतीला मोठा धक्का बसला आहे. 
भाजपचे नगरसेवक विजय उर्फ रिंकू देसाई यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. नगरसेवक विजय उर्फ रिंकू देसाई हे प्रभाग क्रमांक ९ मधून चुरशीने निवडून आले आहेत. त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने महायुतीला मोठा झटका बसला असल्याची चर्चा रंगू लागली आहे.