टीईटी पेपर फुटीचे पडसाद पावसाळी अधिवेशनात...
परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात सरकार वारंवार अपयशी का ठरतंय : आ. विजय वडेट्टीवार यांचा सवाल
मुंबई – राज्यात शिक्षकांचा टीईटी पेपर फुटल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याचे पडसाद आता पावसाळी विधिमंडळातही उमटले आहेत. यावेळी पेपर फुटीवरून विधान परिषदेत सदस्यांनी मोठा गोंधळ घातला. यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी विधिमंडळात, परीक्षा पारदर्शक पद्धतीने घेण्यात सरकार वारंवार अपयशी का ठरत आहे, याचे उत्तर सरकारने महाराष्ट्राला द्यावे, अशी मागणी केलीय.
आ. विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे कि, महाराष्ट्रात NEET, TET यासारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये वारंवार पेपर फुटीच्या घटना घडत असल्याने राज्याची देशभर बदनामी होत असून लाखो विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. लाखो विद्यार्थी आणि शिक्षक वर्षानुवर्षे मेहनत घेऊन परीक्षेची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीच्या घटनांमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फिरत आहे.
TET पेपरफुटी प्रकरणातील धागेदोरे, पेपर तयार करणाऱ्या संस्था, संबंधित कंपन्या आणि या प्रकरणा मागील संपूर्ण साखळीची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.