हवामान विभागाचा नवा अंदाज दिलासा देणारा...

 

रेंगाळलेला मान्सून २५ जूननंतर होणार सक्रिय... राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज

<p>हवामान विभागाचा नवा अंदाज दिलासा देणारा...</p>

<p> </p>

पुणे - मान्सूनने आठ जूनला राज्यात प्रवेश करत कोकणासह मध्य महाराष्ट्रातील काही भाग व्यापला आहे. मात्र त्यानंतर पोषक स्थिती नसल्याने मान्सूनची वाटचाल ठप्प झाली आहे. सध्या मान्सूनची सीमा हरणई, सोलापरू, हैदराबाद, भ्रदाचलम, रांची, मुझफ्फरपूर भागात आहे. मान्सूनने व्यापलेल्या या भागातही पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे.

पावसाअभावी खरीप हंगामावर यंदा मोठे संकट ओढवल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. मात्र आता रखडलेल्या मान्सूनच्या पुढच्या वाटचालीला पोषक वातावरण तयार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २५ जूननंतर मान्सून सक्रिय होवून १ जुलै पर्यंत संपूर्ण राज्यात मान्सून पोहोचण्याची शक्यता आहे. या काळात राज्याच्या काही भागात चांगल्या पावसाचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.