राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना खासदार...: राज ठाकरेंची बंडखोरांवर घणाघाती टीका 

<p>राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना खासदार...: राज ठाकरेंची बंडखोरांवर घणाघाती टीका </p>

मुंबई - राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना खासदार फोडले जात आहेत. हे गेलेले खासदार भविष्यातील पिढीला काय सांगणार की आम्ही विकलो गेलोय. सत्ता टिकावी म्हणून कोट्यावधी फेकून खासदार फोडले जात , असल्याची घणाघाती टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बंडखोरांवर केली आहे. 
राज्यात अजून पाऊस नाही, दुष्काळाची परिस्थिती असताना सत्ता टिकवण्यासाठी पैसे फेकून खासदार फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. राज्याच्या राजकारणात वर्षभरात कधी काहीही होऊ शकतं.  आत्ताच्या   आणि पूर्वीच्या  राजकारणात जमीन अस्मानाचा फरक आहे आत्ताची फोडाफोडी ही 2029 साठी केलेली  शहांची खेळी आहे.  केंद्रात आणि राज्यात सत्ता भाजपची आहे मग हे सहा खासदार शिंदेंच्या गटात का गेलेत, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला.