आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा : खा. ओमराजे निंबाळकर

पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात 

<p>आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा : खा. ओमराजे निंबाळकर</p>

मुंबई – आज तब्बल 20 वर्षानंतर खा. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाचा अंतिम निकाल हाती येणार आहे. या महत्वाच्या सुनावणीसाठी गेल्या चार – पाच दिवसांपासून नॉट रिचेबल राहिलेले बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर कोर्टात दाखल झाले आहेत. 
सध्या पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांड प्रकरणाच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे. या सुनावणी पूर्वी खा. ओमराजे निंबाळकर यांनी, “आजचा दिवस माझ्यासाठी खूप मोठा”, असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.