श्री अंबाबाई देवीचं मंदिर हे केवळ कोल्हापूरचेच नाही, तर...: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

<p>श्री अंबाबाई देवीचं मंदिर हे केवळ कोल्हापूरचेच नाही, तर...: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस </p>

कोल्हापूर - श्री अंबाबाई देवीचं मंदिर हे केवळ कोल्हापूरचेच नाही, तर संपूर्ण देशातील जनतेचे श्रद्धास्थान असल्याचे प्रतिपादन  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. आज अंबाबाई मंदीर संवर्धन विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. 

श्री अंबाबाई देवीच्या मंदिराचा भव्य विकास व्हावा, अशी सर्वांचीच इच्छा होती. अंबाबाई मंदिराचा जसा विकास व्हायला हवा होता, तसा तो स्थानिक पातळीवर झाला नाही, असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अभित शहा यांनी  या प्रकल्पासाठी निधी मंजूर केला आणि आज त्यांच्याच हस्ते या विकास कामांचा शुभारंभ होत, असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.