अद्याप राजकीय निर्णय नाही...: खा. ओमराजे निंबाळकर
मुंबई – आज तब्बल २० वर्षानंतर खा. ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा अंतिम निकाल लागला आहे. यामध्ये सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावर खा. ओमराजे निंबाळकर यांनी, हे कलियुग असल्याचे म्हटले आहे.
खा. ओमराजे निंबाळकर यांनी म्हटले आहे कि, कोर्टाने दिलेला निकाल दुर्दैवी असून मी हायकोर्टात दाद मागणार आहे. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला मुंबई पोलीस करत होते. त्यावेळी त्यांच्यावर खूप दबाव होता, असे त्यांनी म्हटले आहे.
यावेळी राजकीय भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी म्हटले आहे कि, अद्याप राजकीय निर्णय घेतलेला नाही. मतदार संघात जाऊन चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे.