डॉ. संजय डी पाटील यांना पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर...

<p>डॉ. संजय डी पाटील यांना पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर...</p>

कोल्हापूर – कृषी, फलोत्पादन, पर्यावरण संवर्धन शेती व  शेतकरी विकास आणि कृषी उद्योजकता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष,आणि  डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलपती डॉक्टर संजय डी पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
 कृषी विकासासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा सर्वोच्च सन्मान दिला जातो.  डॉक्टर संजय डी पाटील यांनी आधुनिक शेती, फलोउत्पादन, पर्यावरण संवर्धन, शेतकरी मार्गदर्शन, कृषी उद्योजकता आणि ग्रामीण विकासाचा प्रभावी संगम घडवून अनेक अभिनव उपक्रम राबवले आहेत. तळसंदे येथील माळावर त्यांनी वनराई फुलवली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, वैज्ञानिक शेती पद्धती, उत्पादन वाढ आणि मुल्यवर्धन याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत शासनाच्यावतीने त्यांना 2023 चा  डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.