जिल्ह्यातील नद्या कोरड्या पडू लागल्याने राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु... 

कोल्हापूर – जून महिना निम्मा संपला तरी पावसाचा पत्ता नसल्याने एकीकडे शेतकरी चिंतेत असताना दुसरीकडे  पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समोर येवून ठेपला आहे.  मेघराजाने पाठ फिरवल्याने राज्यासह जिल्ह्यातील नद्या कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  ही गरज ओळखून राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे.  
पावसाने ओढ दिल्याने आजच्या घडीला भोगावती नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी जनतेच्या मागणीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी, काल सायंकाळी चारच्या दरम्यान  राधानगरी धरणातून  600 क्यूसेकने भोगावती नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडला आहे.