जगातील सर्वात महागडा आंबा अयोध्येतील प्रभू रामाच्या चरणी अर्पण 

<p>जगातील सर्वात महागडा आंबा अयोध्येतील प्रभू रामाच्या चरणी अर्पण </p>

अयोध्या – 'एग ऑफ द सन' या नावाने लोकप्रिय असलेला जपानी 'मियाझाकी' जातीचा जगातील सर्वात महागडा असणारा आंबा अयोध्येतील प्रभू रामाच्या चरणी अर्पण करण्यात आला आहे.
या आंब्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति किलो २.५ लाख ते ३ लाख रुपयांच्या दरम्यान आहे. हा दुर्मिळ आंबा अयोध्येतील एका स्थानिक शेतकऱ्याने पिकवला आहे.  या  आंब्याचा नैवेद्य प्रभू रामाना दाखवण्यात आला आहे. 
परंपरेचे पालन करत हा आंबा तुळशीच्या पानासह देवाच्या चरणी अर्पण करण्यात आला. मियाझाकी आंब्याचे उत्पादन शेतकरी ओमप्रकाश सिंह यांनी केले आहे. त्यांनी अयोध्येतील हवामानाशी हे झाड जुळवून घेते का, हे पाहण्यासाठी सुमारे दोन वर्षांपूर्वी त्याची लागवड केली होती. सिंह यांच्या मते, हे झाड स्थानिक वातावरणाशी यशस्वीपणे जुळवून घेण्यास यशस्वी ठरले असून  या हंगामात त्याला जवळपास डझनभर आंबे लागले, असल्याचे त्यांनी सांगितले.