उपसा बंदी विरोधात शेतकरी आक्रमक ; सिंचन भवनसमोर शेतकऱ्यांचा ठिय्या
कोल्हापूर – पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी खूप घटली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून जलसंपदा विभागाकडून जिल्ह्यातील नदीच्या पात्रातून शेतीसाठी पाणी उपसण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जलसंपदा विभागाने पाणी उपसण्यास बंदी घातल्यामुळे शेतामधील पिकं जगवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. त्यासाठी आज या उपसा बंदीच्या विरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक होत सिंचन भवनाच्या कार्यालयासमोर ठिय्या मारला. त्यामुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.