जलसंपदा विभागाने जिल्ह्यातील उपसा बंदी उठवली : शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला यश
कोल्हापूर - जलसंपदा विभागाने काल पासून कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीसह १० नद्यांवर उपसा बंदीचा आदेश लागू केला होता. त्या विरोधात आज शेतकऱ्यांनी आक्रमक होत सिंचन भवनवर ठिय्या आंदोलन करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
यावेळी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची व्यथा ऐकूण घेतली. यावर जलसंपदा विभागाचे अधिकारी चंद्रशेखर पाटोळे यांनी, शेतीतील पिकांच्या नुकसानीचा विचार करून टप्प्या टप्प्यामध्ये आपण उपसा बंदी उठवत असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला यश आले आहे.