अ .भा . मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची तर उपाध्यक्षपदी यमकर आणि आनंद शिंदे यांची निवड
कोल्हापूर - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी मेघराज राजेभोसले यांची तर उपाध्यक्षपदी धनाजी यमकर आणि ज्येष्ठ गायक आनंद शिंदे यांची निवड झाली आहे. या निवडीची घोषणा आजच्या पत्रकार बैठकीत अभिनेता सुशांत शेलार यांनी केली आहे.
यावेळी प्रमुख कार्यवाहपदी सुशांत शेलार, सह कार्यवाहपदी दीपक कदम आणि वासू पाटील, खजिनदारपदी सुनील महाजन तर सह खजिनदारपदी शरद चव्हाण यांची निवड झाली आहे.