पंचगंगा नदीच्या पाण्यावरून आंदोलन अंकुश संघटना अन् पोलिसांमध्ये झटापट...
इचलकरंजी – पंचगंगा नदीच्या प्रदूषणा विरोधात इचलकरंजीतील पाणी पुरवठा रोखण्यासाठी आंदोलन अंकुश संघटनेसह शिरोळ तालुक्यातील नागरिक एकवटले होते. यावेळी आंदोलक पाणी रोखण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट होवून मोठया प्रमाणात धक्काबुक्की झाली यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. यावेळी आंदोलकांनी टायर पेटवण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.