डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया -‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने उपक्रम

आतापर्यंत १३६ हून अधिक रुग्णावर मोफत शस्त्रक्रिया

<p>डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२ रुग्णांवर मणक्याच्या यशस्वी शस्त्रक्रिया -‘द स्पाईन फाऊंडेशन, मुंबई’च्या सहकार्याने उपक्रम</p>

माळशिरस : देवदर्शन करून आनंदाने घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाने वाटेतच झडप घातल्याची हृदयद्रावक घटना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात घडली. म्हसवड-पंढरपूर मार्गावरील तांदूळवाडी गावाजवळ पिकअप वाहन थेट विहिरीत कोसळल्याने नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर काही जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविक म्हसवड येथील सिद्धनाथांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून सर्वजण पिकअप वाहनातून गावाकडे परतत होते. म्हसवड-तांदूळवाडी मार्गावर वाहन आल्यानंतर अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि पिकअप रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली. विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने अनेक भाविकांना बाहेर पडता आले नाही. काहींनी जीवाच्या आकांताने पोहून बाहेर येण्याचा प्रयत्न केला, तर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्याचे आणि बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मृतांमध्ये चार महिला आणि चार लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती दिली. विहिरीत पाणी असल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून अपघाताचे नेमके कारण स्पष्ट झालं नाही. या भीषण दुर्घटनेमुळे रांजणी गावासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून एका क्षणात अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.