महिलेला वेश्याव्यवसायास भाग पाडल्याप्रकरणी विनायक पवारला अटक

<p>महिलेला वेश्याव्यवसायास भाग पाडल्याप्रकरणी विनायक पवारला अटक</p>

इचलकरंजी - केवळ सात हजार रुपयांचे कर्ज देऊन व्याजापोटी दीड लाख रुपये घेतले आणि त्यानंतर सुद्धा महिलेला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याचा प्रकार नुकताच इचलकरंजीत घडला आहे.

या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, शिवाजीनगर पोलिसांनी सर्जेराव कुंभार, उज्वला दोरुगडे आणि विनायक पवार या तिघांच्या विरोधात खाजगी सावकारी तसेच वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी पसार झाले होते. यापैकी विनायक पवारला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. विनायक पवारला आज न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी अजून पसार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.