नेमबाज प्रशिक्षक जसपाल राणा काळाच्या पडद्याआड...
नेमबाज मनू भाकर यांच्यावर दु:खाचा डोंगर
मुंबई - प्रसिद्ध नेमबाज प्रशिक्षक जसपाल राणा यांचे आज अचानक निधन झाले आहे. नेमबाज मनू भाकर यांचे ते प्रशिक्षक होते. त्यामुळे मनू भाकर यांच्यावर दु :खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अचानक निधनाने नेमबाजी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
जसपाल राणा हे जर्मनीतील म्युनिक येथून भारतात येत होते. विमान प्रवासादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. विमान दिल्ली विमानतळावर उतरताच, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.
जसपाल राणा भारताचे एक उत्कृष्ट नेमबाज होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आशियाई खेळांमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकून देशाची मान उंचावली होती. खेळाडू म्हणून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी प्रशिक्षक म्हणून भारतीय नेमबाजांना घडवण्याचे मोलाचे काम केले. नेमबाज मनू भाकर या त्यांच्या तालमीत तयार झाल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे मनूने ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकून इतिहास रचला होता.