पेपरफुटीविरोधात काँग्रेस देशभरात करणार आंदोलन...कोटामधून होणार सुरुवात
नवी दिल्ली – देशात सुरु असलेल्या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. यामुळे अनेकांनी आत्महत्यासारखे पाऊलही उचलल्याच्या घटना घडल्या आहेत. या विद्यार्थ्यांसाठी काँग्रेस पक्षाने देशभर आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची सुरुवात 17 जून रोजी राजस्थानमधील कोटा येथून होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांवर देशव्यापी जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. यावेळी राहुल गांधी देशभरातील विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. त्यानुसार कोटा येथे 17 जूनला पहिली सभा होईल. त्यानंतर 10 जुलैला इलाहाबाद, 11 जुलैला पटना आणि 14 जुलैला दिल्ली येथे विद्यार्थी संमेलनांचे आयोजन करण्यात येणार आहे.