‘हे’ असणार देशाचे नवे लष्करप्रमुख...
नवी दिल्ली – देशाच्या लष्करप्रमुख पदी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ३० जूनपासून ते लष्करप्रमुख पदी विराजमान होणार आहेत.
संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, " राष्ट्रपतींनी लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची जनरल पदावर पुढील 'चीफ ऑफ आर्मी स्टाफ' (लष्करप्रमुख) म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली आहे. ही नियुक्ती ३० जून २०२६ पासून लागू होईल आणि ते जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील. लेफ्टनंट जनरल सेठ यांचा कार्यकाळ ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंत असेल."