‘मला आणखी एक संधी द्या’ ; गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रणित मोरेने मागितली माफी 

<p>‘मला आणखी एक संधी द्या’ ; गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रणित मोरेने मागितली माफी </p>

मुंबई - स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे याच्या एका शो मध्ये महिलांविषयी अश्लिल आणि आक्षेपार्ह वक्तव्य केले गेले. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावरून खूप मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग केले गेले. तसेच या प्रकरणी प्रणित मोरे, हिमांशू जांग्रा, डॉ. सेजल पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यावर प्रणित मोरे याने प्रेक्षकांची माफी मागत, मला आणखी एक संधी द्या, असा व्हिडीओ शेअर केला आहे. 
प्रणित मोरेने म्हटले आहे की, या विषयावर बऱ्याच दिवसांपासून बोलू इच्छित होतो. मात्र इन्स्टाग्राम खाते सस्पेंड झाल्यामुळे आपली भूमिका मांडू शकलो नाही. वादग्रस्त 'क्राउड वॉक' व्हिडिओबद्दल बोलताना त्याने कबूल केले की, त्याच्यावर होणारी टीका काही प्रमाणात योग्यच आहे.
"त्या मुलासोबत संवाद सुरू असताना त्याने काही अत्यंत आक्षेपार्ह आणि महिलांचा अपमान करणारी वक्तव्ये केली. पण त्या वेळी प्रेक्षक हसत होते आणि मीही त्या वातावरणात वाहवत गेलो. तिथेच माझा निर्णय चुकला, त्या व्यक्तीला तात्काळ थांबवण्याची किंवा त्याच्या वक्तव्यांचा विरोध करण्याची संधी होती. मात्र मी तसं करू शकलो नाही.
 "मी त्याला एक व्यासपीठ दिलं आणि त्यामुळे हा विषय इतका मोठा झाला. त्यामुळे ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या, त्या सर्वांची मी मनापासून माफी मागतो," असे त्याने व्हिडीओत म्हटले आहे.