कोल्हाटी डोंबारी समाज संघटनेच्यावतीने महापालिका आयुक्तांना निवेदन
कोल्हापूर – कसबा बावडा येथील लाखे वसाहत मधील 40 लोकांचे २०११ चे पूर्वीचे अतिक्रमण नियमाकुल करण्याची मागणी कोल्हाटी डोंबारी समाज संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांना देण्यात आले आहे. यावेळी पर्याय व्यवस्थेची मागणीही करण्यात आली.
निवेदन देते वेळी कोल्हापूर जिल्ह्याचे युवा अध्यक्ष तुकाराम लाखे, रवि लाखे, विठ्ठल लाखे, सुरेश लाखे, हैबतो लाखे, राजु लाखे, राहुल लाखे आदि उपस्थित होते.