शाहूपुरी पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन... तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक

<p>शाहूपुरी पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन... तलवार घेऊन फिरणाऱ्याला अटक</p>

कोल्हापूर – पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार शाहूपुरी पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील कनाननगर, माकडवाला वसाहत, सदर बाजार, परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवले. यावेळी तडीपार आणि रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या घरांची झडती घेण्यात आली.

 या ऑपरेशनवेळी माकडवाला वसाहत परिसरात राहणारा रेकॉर्डवरील गुन्हेगार संग्राम पवार हा तलवार घेवून परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने त्याला तात्काळ अटक केली. शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, लक्ष्मीपुरीचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, दंगल काबू पथक आणि गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता.