वादळाचा फटका दिल्लीतील एअर इंडियाच्या विमानांना...मोठे नुकसान
नवी दिल्ली – काल रात्री दिल्लीतील एअर इंडियाच्या तीन विमानांना वादळाचा मोठा फटका बसला आहे. यामध्ये विमानांचे मोठे नुकसान झाले आहे.
अचानक सुरु झालेल्या वादळामुळे दिल्ली विमानतळावरील टर्मिनल २ वर पार्क करण्यात आलेल्या विमानांना इंजिनिअरिंग उपकरणे येवून धडकल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली एअरपोर्ट ऑपरेटरने दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही विमानांना धावपट्टीवरील उपकरणे धडकली आहेत. त्यानंतर त्यांची सेवा त्वरित थांबवण्यात आली आहे.