अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराजे भोसलेंचे पॅनेल विजयी...
कोल्हापूर - अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत मेघराजे भोसले यांचे पॅनेल विरुद्ध आनंद काळे – सतीश रणदिवे यांचे पॅनेल अशी लढत रंगली होती. अखेर यामध्ये मेघराजे भोसले यांच्या पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
राज्यातील पाच केंद्रांतंर्गत 12 मतदान केंद्रांवर 1 हजार 698 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. एकूण 17 जागांपैकी वर्षा उसगावकर, आनंद शिंदे, विजय खोचीकर हे तीन उमेदवार अगोदरच बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित 14 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात होते. यावेळी चांगल्या मतांनी मेघराज भोसलेंच्या नेतृत्वाखाली 'टीम समर्थ’ ने विजय मिळवला आहे.
विजयी उमेदवारांची नावे –
* मेघराज राजेभोसले - निर्माता
* सुनील महाजन - निर्माता
* दिपक कदम - दिग्दर्शक
* अजित शिरोळे - दिग्दर्शक
* राज काझी - लेखक
* सुशांत शेलार - अभिनेता
* धनाजी यमकर - छायाचित्रण
* शरद चव्हाण - ध्वनीरेखक
* रवी गावडे - निर्मिती व्यवस्था
* सुभाष नकाशे - नृत्य दिग्दर्शक
* प्रवीण (वासू )पाटील - कला दिग्दर्शक
* चैत्राली डोंगरे - रंगभूषा/वेशभूषा
* गणेश गारगोटे - वितरण/प्रसिध्दी
* विकास तोरणे - कामगार