कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही : आ.बच्चू कडूंचा घरचा आहेर
मुंबई – विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असल्याचा आरोप आ.बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करून घरचा आहेर दिला आहे. कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. भंडाऱ्यातील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
“आम्हाला अपेक्षा आहे की, देवाभाऊंचे प्रमोशन व्हावे आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे”, अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.