दोन महिन्यानंतर इस्रायल – इराण युद्धाला पुन्हा सुरुवात...
नवी दिल्ली – इस्रायल – इराण युद्ध ८ एप्रिलपासून थांबले होते. परंतु आता तब्बल दोन महिन्यांनी या युद्धाला पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे.
इराणने काल (रविवारी) रात्री उत्तर इस्रायलच्या काही भागात बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहे तर, इस्रायलनेही प्रतिहल्ला केला आहे.
इस्रायली लष्कराने या हल्ल्याविषयी सांगितले की, इराणमधून डागलेली क्षेपणास्त्रे इस्रायली लष्कराने शोधून काढली असून त्वरित हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी रहिवाशांना येणाऱ्या धोक्याची चेतावणी दिल्याने अनेक भागांत सायरन वाजले आहेत. हवाई दलाने आतापर्यंत इराणमधून डागलेली सर्व क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट केली आहेत. इस्रायलच्या दिशेने आणखी क्षेपणास्त्रे डागल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.