'गॅलॅक्सी डेन्टल केअर अॅण्ड इम्प्लांट सेंटर'चे आ. सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन...

<p>'गॅलॅक्सी डेन्टल केअर अॅण्ड इम्प्लांट सेंटर'चे आ. सतेज पाटील यांच्या हस्ते उद्घाटन...</p>

कोल्हापूर -  कसबा बावड्यातील रेणुका मंदिर परिसरातील गृहयोग अपार्टमेंट मधील गॅलॅक्सी डेन्टल केअर अॅण्ड इम्प्लांट सेंटरचे उद्घाटन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रुग्णालयातील सुविधांची त्यांनी पाहणी केली.

या सेंटरमध्ये मशीनद्वारे दातांची स्वच्छता, रूट कॅनाल उपचार, वेडेवाकडे दात सरळ करणे, अक्कलदाढ काढणे, हिरड्यांच्या आजारांवरील उपचार तसेच अत्याधुनिक इम्प्लांट शस्त्रक्रियेद्वारे कायमस्वरूपी दात बसवण्याच्या सुविधा उपलब्ध आहेत.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, दातांच्या आरोग्याबाबत जनजागृती होणे आवश्यक असल्याचे सांगितले. दंत आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास विविध आजारांना सामोरे जावे लागते. त्यामुळे वेळेवर उपचार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. गॅलेक्सी डेंटल केअरमुळे कसबा बावडा परिसरातील नागरिकांना आता आधुनिक आणि सर्वसमावेशक दंत उपचारांची सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. डॉक्टर फजल मुजावर यांनी, गॅलॅक्सी डेन्टल केअर अॅण्ड इम्प्लांट सेंटरच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या माध्यमातून दंत उपचारांची दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी सलीम मुजावर, नगरसेवक सुभाष बुचडे, सचिन चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.