कुंभारवाडीतील टायफॉइड रुग्ण संख्या आटोक्यात...

<p>कुंभारवाडीतील टायफॉइड रुग्ण संख्या आटोक्यात...</p>

कोल्हापूर -  कुंभारवाडी येथील दूषित पाणी मिसळल्याने टायफॉईडचे रुग्ण आढळून आले होते. मोठ्या संख्येने रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. त्यानंतर एकशे एकेचाळीस ग्रामस्थांच्या रक्तांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकेचाळीस रुग्णांना किरकोळ ताप असल्याने ते उपचार घेऊन परतले. मात्र टायफॉइडचे अठरा रुग्ण आढळून आले आहेत. यातील सोळा रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. सध्या दोन टायफॉईडचे रूग्ण आहेत.

 दरम्यान, आमदार चंद्रदीप नरके यांनी कुंभारवाडीत भेट दिली आहे. ज्या पाईपलाईनमुळे दूषित पाणी पुरवठा झाला ती पाईपलाईन तात्काळ बदलण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध करून देत असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करण्याच्या सूचना आमदार नरकेंनी दिल्या आहेत.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रवींद्र पाटील, तालुका आरोग्य अधिकारी शैलेश गायकवाड, डॉ. लता सरोळे, मिलिंद गुळवणी, वैद्यकिय अधिकारी शुभम माने, डॉ. बी डी प्रभावळे' शरद खाडे, रोहन भावके, अश्विनी मोळे ऋषिकेश जाधव, कळेचे सरपंच सुभाष पाटील, आनंदा बेलेकर  आदि उपस्थित होते.