सर्वसामान्यांना महागाईचा झटका : घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात उच्चांकी वाढ
मुंबई – महागाई आणि पेट्रोल – डिझेलच्या दर वाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना आता आणखीन एक धक्का केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिला आहे. केंद्राने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 29 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे महागाईची मोठी झळ सर्वसामान्यांना बसली आहे.
ही दरवाढ 14.2 किलोच्या सिलिंडरवर करण्यात आली असून, दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून थेट 942 रुपयांवर पोहोचली आहे. तर मुंबईतील दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपयांवर पोहचले आहे.