प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असं सांगितलं पण...: खा. शरद पवारांची गॅस दर वाढीवर टीका 

<p>प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असं सांगितलं पण...: खा. शरद पवारांची गॅस दर वाढीवर टीका </p>

कोल्हापूर – आज केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडरमध्ये २९ रुपयांची वाढ केल्याने सर्वसामान्यांना महागाईचा मोठा झटका बसला आहे यावर खा. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ते आज कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. 


खा. शरद पवार यांनी म्हटले आहे की, "सातत्याने हे दर वाढवतायेत, या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर होतोय. प्रधानमंत्र्यांनी सुरुवातीला आम्ही महागाई नियंत्रित ठेवतोय, असं सांगितलं. पण, नियंत्रित याचा अर्थ टप्प्या टप्प्यानं हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे, त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी कळेल.”