‘नवनीत राणा हा विषय राष्ट्रवादीकडून संपलेला आहे’ ; खासदारकीसाठी नेत्यांची चढाओढ
मुंबई - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी अनेकांची चढाओढ सुरु झाली आहे. या राष्ट्रवादीच्या जागेसाठी भाजप नेत्या नवनीत राणा यांची वर्णी लागणार अशी चर्चा सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, "नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्याचा विषय संपलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक संध्याकाळी होईल. त्या संदर्भातला अंतिम निर्णय सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून आम्ही निर्णय घेऊ," असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला राज्यसभेवर पाठवणार... हे पहावे लागणार आहे.